Ad will apear here
Next
‘पॉझिटिव्हिटी’ त्यांच्या रक्तातच आहे!
देवरुखातील बंधू कोळवणकर यांचे आतापर्यंत ९१ वेळा रक्तदान
देवरुख : रक्तदान करण्याबद्दल जनजागृती चांगलीच वाढली आहे. तरीही एखाद-दुसऱ्या वेळेपेक्षा जास्त वेळा रक्तदान करणाऱ्यांची संख्या मोठी नसते. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील उदय गणपत उर्फ बंधू कोळवणकर यांचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण ठरते. आता ५२ वर्षांचे असलेल्या उदय यांनी आतापर्यंत ९१ वेळा रक्तदान केले असून, दूरच्या ठिकाणीही स्वखर्चाने जाऊन त्यांनी गरजू रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. ‘ए पॉझिटिव्ह’ हा रक्तगट असलेल्या उदय यांच्या रक्तातच ‘पॉझिटिव्हिटी’ आहे ती अशी!

पत्नी आणि मुलासह कोळवणकर देवरुखात वास्तव्याला असून, ते एका स्थानिक पतसंस्थेसाठी पिग्मी जमा करण्याचे काम करतात. नियमित पाच ते सात किलोमीटर अंतर सायकल चालवत आपले काम करणारे बंधू व्यायामावर आणि निरोगी राहण्यावर भर देतात. रात्री-अपरात्री कधीही त्यांना फोन आला, की जिथे कुठे गरज असेल तिथे स्वखर्चाने जाऊन ते रक्तदान करतात. केवळ रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे, तर सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबईत जाऊनही त्यांनी गरजू रुग्णांना रक्त दिले आहे. 

१९८३मध्ये उदय यांना स्वतःच्या आईला तिच्या आजारपणात रक्त देण्याची वेळ आली. त्या वेळी  आजच्या एवढे प्रगत तंत्रज्ञान नव्हते. त्या काळात उद्भवलेल्या स्थितीनंतर त्यांनी गरजूंना रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत त्यांनी ९१ वेळा रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना स्थानिक पातळीवर अनेक वेळा गौरवण्यात आले आहे. 

उदय कोळवणकरदेवरुखातील ‘ब्लड डोनर मॅन’ अशीच त्यांची ओळख आहे. त्याशिवाय त्यांनी डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर देहदानाचा अर्ज भरला आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत्रदानाचाही अर्ज भरला आहे. 

‘रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. आपल्या शरीरातील रक्ताने एखाद्याचे प्राण वाचत असतील, तर त्यासाठी प्रत्येकाने नक्कीच पुढाकार घ्यायला हावा. याच भावनेतून मी हे रक्तदान अभियान राबवत आहे. शतक होण्याकडे लक्ष नाही; पण जोपर्यंत झेपेल तोपर्यंत गरजूंना रक्त देण्यासाठी मी सदैव तयार असेन,’ असे ते सांगतात.

कुणालाही, कधीही ए पॉझिटिव्ह रक्ताची गरज असल्यास ९९७५८ ५२०३० या आपल्या क्रमांकावर संपर्क साधायला सांगायचेही ते विसरत नाहीत!
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZKIBT
Similar Posts
पुण्या-मुंबईत उजळणार देवरुखचे आकाशकंदील देवरुख : महिला बचत गटांच्या पारंपरिक व्यवसायाला छेद देऊन रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील श्री सद्गुरू सेवा सहकारी संस्थेतील महिलांनी एक नवी वाट चोखाळली आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या निमित्ताने या गटातील महिलांनी आकाशकंदील बनवण्याची ऑर्डर स्वीकारली असून, त्यांनी बनविलेले
साच्यांच्या जमान्यात हस्तकौशल्यातून मूर्ती साकारणारा कलावंत देवरुख : वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अलीकडे साच्यातून झटपट गणेशमूर्ती तयार करण्यावर भर दिला जातो; मात्र देवरुखातील एका मूर्तिशाळेत फक्त हस्तकौशल्यातूनच मूर्ती साकारल्या जातात. शाडूच्या मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या या मूर्ती अत्यंत सुबक असतात. देवरुखच्या मधल्या आळीतील या मूर्तिकाराचे नाव आहे उदय भिडे
ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न देवरुख : एकीकडे राज्यभरातील शिवकालीन ठेव्यांची दुर्दशा, पडझड होत असतानाच दुसरीकडे मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील निगुडवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत शिवकालीन महिमतगडाची संवर्धन मोहीम हाती घेतली आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानीही वेळ काढून स्थानिक ग्रामस्थांच्या
दर शनिवारी दप्तराविना शाळा देवरुख : शाळकरी मुलांच्या पाठीवरचे ओझे हा अत्यंत गंभीर विषय आहे. त्यावर अनेक उपाय सुचविण्यात आलेले असले, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र अगदी नगण्य. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळच्या पूर गावातील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार दप्तराविना असतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language